इम्रान खान यांचे मोदींकडून अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना दूरध्वनी करून निवडणुकीतील यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाकिस्तानमध्ये लोकशाहीची मुळे भक्कम होतील, अशी आशा मोदी यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चेदरम्यान व्यक्त केली. अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

Web Title: Imran Khan congratulated by Modi