
Imran Khan : अटक टाळण्यासाठी इम्रान खान शेजाऱ्यांच्या घरात लपले; पाक गृहमंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली - पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला आहे की, तोशाखाना प्रकरणात अटक टाळण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या लाहोर मधील निवासस्थानाची भिंत ओलांडून शेजारच्या घरात पळ काढला होता. खान यांना अटक करण्यासाठी पोलिस लाहोरला दाखल झाले होते. मात्र ते रिकाम्या हातीच परतले.
पोलिस खान यांना न घेताच परतल्याने सनाउल्लाह यांनी हे विधान केलं. खान यांच्या लिगल टीमने पोलिसांना सांगितलं की, ७ मार्च रोजी खान न्यायालयात हजर राहणार आहे.
इम्रान खान यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला लाहोरमध्ये नाट्यमय घडामोडींना सामोरे जावे लागले. अशी अफवा आहे की खान भिंत ओलांडून शेजाऱ्याच्या घरी पळून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी भाषण केले होते.' तसेच माजी पंतप्रधानांना अटक कराण्यासाठी पोलिसांनी योग्य रणनीती वापरली नव्हती, असे ते म्हणाले.