जर 2004 साली भाजप पुन्हा सत्तेत आले असते तर...- इम्रान खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

2004 साली जर भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले असते आणि पुन्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे झाले असते तर, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच कळीचा ठरलेला काश्मीर प्रश्न सुटला असता, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.

इस्लामाबाद - 2004 साली जर भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले असते आणि पुन्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे झाले असते तर, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच कळीचा ठरलेला काश्मीर प्रश्न सुटला असता, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.

पुढे ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच काश्मीर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये युद्धेही झाली. अनेक दशके उलटल्यानंतरही काश्मीर प्रश्न सुटू शकलेला नाही. मात्र आता युद्ध नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सुटेल आणि त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी हा प्रश्न चर्चेनेच सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान खान यांनी असे मत व्यक्त केले आहे.

यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही युद्धाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ''अण्वस्त्रसंपन्न असलेलेल दोन देश युद्ध करू शकत नाही. कारण याचा परिणाम धोकादायक ठरू शकतो." असेही इम्रान खान यावेळी म्हणाले.

Web Title: Imran Khan On What Ex-PM AB Vajpayee Told Him About Kashmir