निवडणूक लढविण्याची इम्रान खानना परवानगी

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तानातील निवडणूक लढविण्यास न्यायिक ट्रिब्युनलने परवानगी दिली आहे. इम्रान खान यांच्याविरुद्धचे सर्व दावे या ट्रिब्युनलने फेटाळून त्यांना ही परवानगी दिली आहे, असे वृत्त जिओ टीव्हीने दिले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तानातील निवडणूक लढविण्यास न्यायिक ट्रिब्युनलने परवानगी दिली आहे. इम्रान खान यांच्याविरुद्धचे सर्व दावे या ट्रिब्युनलने फेटाळून त्यांना ही परवानगी दिली आहे, असे वृत्त जिओ टीव्हीने दिले आहे.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि निवडणूक निर्णय अधिकारी महंमद अदनान खान यांनी गेल्या आठवड्यात इम्रान खान यांचा उमेदवारी अर्ज नाकारला होता. प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे इम्रान खान यांच्यासह पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज गट) शाहीद अब्बासी, सरदार मेहताब अब्बासी आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे आयेशा गुलाली यांचेही अर्ज फेटाळण्यात आले होते. 

Web Title: Imran Khan's permission to contest the election