
A 13-year-old girl in Odisha's Parlakhemundi allegedly killed her adoptive mother with help from her boyfriend : दत्तक घेतलेल्या १३ वर्षीय मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरात ही घटना घडली. राजलक्ष्मी असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिलांनी आरोपी मुलीसह तिचा प्रियकर आणि अन्य एका मित्राला अटक केली आहे. हत्येच्या दोन आठवड्यांनंतर या घटनेचा उलगडा झाला.