वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अपुरी नुकसान भरपाई

Elephant
Elephant

देशातील ११ अभयारण्याजवळील ५,१९६ कुटुंबांचे सर्वेक्षण 
नवी दिल्ली - भारतात मानव - प्राणी संघर्ष दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. यात अनेकांना प्राणही गमवावे लागत आहेत. भारतात या संघर्षात बळी पडणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांना पुरेशी नुकसानभरपाई दिली जात नसल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. देशातील ११ अभयारण्याजवळील ५, १९६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.  बंगळूरमधील वन्यजीव अभ्यास केंद्राने हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाचे निष्कर्ष ‘पीएनएस’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांनी मनुष्यहानीसह पीके, पशुहानीचाही आढावा घेतला. देशात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास नातेवाईकांना सरासरी १, ९१,४३७ रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे, जखमी होणाऱ्यांना सरासरी ६,१८५ रुपयांची मदत दिली जाते. देशभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत्युच्या  नुकसान भरपाईत प्रचंड विविधता असून हरियाणात ७६, ४०० तर महाराष्ट्रात ८, ७३,९९५ रुपये नातेवाईकांना दिले जातात. संशोधकांच्या मतानुसार अशा मनुष्यहानीबद्दल अधिक चांगली नुकसानभरपाई दिल्यास ज्या वन्य प्रजातींचे संवर्धन करायचे आहे, अशा प्रजातींबद्दलचा वैरभाव कमी होऊ शकतो. 

संशोधक सुमीत गुलाटी म्हणाले, की नुकसान भरपाईचे हे आकडे कामगार बाजारपेठांतील तुलनेच्या आधारे जीवनाचे सांख्यिकिय मूल्य (व्हीएसएल) म्हणून ओळखले जातात. विविध उद्योगांत कामगार कितपत उत्पादनक्षम आहेत, हे ध्यानात घेऊन अर्थतज्ज्ञ संबंधित कामगाराचा मृत्यू किंवा तो जखमी झाल्यास किती नुकसान भरपाई द्यायच, याचा निर्णय घेतात.  वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे.

सहसंशोधिका कृती कारंथ म्हणाल्या, की आमचे संशोधन मनुष्य - वन्यप्राण्यातील जागतिक संघर्षाच्या सर्वांत मोठ्या वैज्ञानिक संशोधनांपैकी एक आहे. गेल्या वर्षभरात हत्ती तसेच रानडुक्कर व नीलगायींमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला.  हत्तींमुळे होणारी जीवितहानी रानडुक्कर व नीलगायीच्या तुलनेत ६०० ते ९०० पट अधिक आहे. त्याचप्रमाणे, वाघाच्या हल्ल्यात बिबट्याच्या तुलनेत तिप्पट तर लांडग्यापेक्षा १०० पट अधिक मनुष्यहानी होते.

सरासरी नुकसान भरपाई एका व्यक्तीमागे (रुपयांत)
१,९१,४३७ - मृत्यू झाल्यास 
६,१८५ - जखमी  झाल्यास

वन्यप्राण्यांबरोबरील संघर्षातील मनुष्यहानीचे अचूक मूल्यमापन करून आवश्यक उपाययोजनांत सरकारने गुंतवणूक केल्यास हा संघर्ष कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांबद्दलची शत्रुत्वाची भावना कमी होण्यासही मदत होईल. त्यातून, अभयारण्याजवळ राहणाऱ्या व्यक्ती व प्रत्यक्ष अभयारण्यातील प्राण्यांमधील सहजीवन आकारास येईल.  
- सुमीत गुलाटी, संशोधक, वन्यजीव अभ्यास केंद्र, बंगळूर  

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com