दक्षिण भारत जैनसभेच्या स्तवनिधीत त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

निपाणी : दक्षिण भारत जैनसभेच्या स्थापनेपासून सभेने विविध क्षेत्रात परिवर्तनासाठी अमूल्य योगदान दिले आहे. आजपर्यंत अनेक अडचणींवर मात करून संघटनेचा विस्तार झाला आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी समाजाने संघटीत राहणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी (कोल्हापूर) यांनी केले. ते स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात आयोजित दक्षिण भारत जैनसभेच्या 98 व्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.

आज (ता. 16) पासून दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचे उद्‌घाटन उद्योजक गोपाल जिनगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सकाळी उद्योजक प्रशांत पाटील (कोल्हापूर) यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. डॉ. ए. एन. उपाध्ये प्रवेशव्दाराचे उद्‌घाटन प्रकाश पाटील (सिद्‌नाळ) यांनी तर ब्रह्मनाथनगरचे उद्‌घाटन रजनीकांत नागावकर यांनी केले. अण्णासाहेब लठ्ठे व्यासपीठाचे उद्‌घाटन श्रीमंधर देसाई यांनी केले.

त्यानंतर डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी म्हणाले, "सभेची स्थापना 1899 मध्ये स्तवनिधी येथे झाली असून सभेला 119 वर्षे होत आहेत. 98 वे त्रैवार्षिक अधिवेशन स्तवनिधीत होत असल्याने याला विशेष महत्त्व आहे. अधिवेशनानिमित्त समाज एकत्रित आला असून समाजहितासाठी भविष्यातही एकत्र असावा. "रावसाहेब पाटील म्हणाले, "आजपर्यंत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील अनेक प्रश्‍नांसाठी आजपर्यंत सभा कृतीशील राहिली आहे. दरवर्षी सभेचा विस्तार वाढत असून कामाची व्याप्ती वाढत आहे. भविष्यातील सभेच्या उन्नतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक आहे."

स्वागताध्यक्ष धन्यकुमार गुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी रावसाहेब पाटील यांनी सभेच्या अध्यक्षपदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला. उद्‌घाटनानंतर जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ, पदवीधर संघटना, वीरसेवा दल यांचे अधिवेशन झाले. यावेळी निलम माणगावे, चांदणी आरवाडे, सुषमा केस्ते, विमल पाटील, ऍड. पी. आर. पाटील, डॉ. सी. एन. चौगुले, सुदर्शन खोत, अरविंद मजलेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील, अभिनंदन पाटील, प्रा. डी. ए. पाटील, रावसाहेब जि. पाटील, सागर चौगुले, ए. ए. नेमण्णावर, संजय शेटे, डॉ. अजित पाटील, उत्तम पाटील, राजू पाटील, किरण पाटील, बाळासाहेब मगदूम, प्रा. विलास उपाध्ये यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: inauguration of dakshin bharat iansabha stavnidhi traivarshik adhivehsan