बड्या कर्जबुडव्यांची नावे प्राप्तिकर विभागाकडून प्रसिद्ध

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

दिल्लीस्थित पाच करबुडव्यांची नावे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. करबुडव्यांच्या यादीमध्ये नावासह त्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पॅन क्रमांक, पत्ता, कर आकारणीची रक्कम, व्यवसाय आदींचा समावेश आहे

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने बड्या करबुडव्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. याबाबत देशातील एका प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये नोटीस देण्यात आली असून, यामध्ये या बड्या कर बुडव्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बड्या करबुडव्यांना थकीत कर तात्काळ भरण्याचे सल्लाही या जाहिरातीद्वारे देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर विभागाने बड्या करबुडव्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. सध्या दिल्लीस्थित पाच करबुडव्यांची नावे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. करबुडव्यांच्या यादीमध्ये नावासह त्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पॅन क्रमांक, पत्ता, कर आकारणीची रक्कम, व्यवसाय आदींचा समावेश आहे. जर लोकांना करबुडव्यांबद्दल माहिती समजल्यास प्राप्तिकर विभागाला कळवावे, असे आवाहनही या जाहिरातीमध्ये कळविण्यात आले आहे.

नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाच करबुडव्यांकडून 10.27 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचे प्रसिद्ध नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही नोटीस प्राप्तिकर विभागाच्या दिल्ली विभागाच्या प्रधान महासंचालकांनी जारी केली आहे. सध्या प्रत्यक्ष कर विभागाच्या (सीबीडीटी) संकेतस्थळावर खालील कर थकविणाऱ्या कंपन्या व कंपनी चालकांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

सीबीडीटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नावे
कंपनी/कंपनी चालकाचे नाव पॅन क्रमांक कंपनीचालक/संचालक/ मालकांचे पालक किंवा वडील थकीत कराची रक्कम (कोटी रुपयांमध्ये)
ट्‌वेंटी फर्स्ट सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉपर्टीज प्रा. लि. AAACZ2590H रामाकृष्ण अब्बूरी आणि लता अब्बुरी 9.82
अप्लायटेक सोल्यु. लि. AABCA8332P पटेल अंकीत 27.7
बनारस लिकर हाऊस AAGFB7027E अभिषेक त्रिपाठी 1.2
बनयान अँड बेरी अलॉयस लि. AABCB7470R अरुणभाय घिसालाल वर्मा 17.48
भावना उदय आचार्य AAFPB1470N दयालजीभाय जोशी 12.97
बिजापूरम मुकुंद राव AGVPB4456E बलवंतराव बिजापुरम 28.1
ब्लू इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी लि. AABCB8718J पुरी दिलीपकुमार 75.11
धीरेन अनंतराय मोदी AFOPM2083A अनंतराय वेलजी मोदी 10.33
डीव्हीआर इन्फ्राटेक प्रा. लि. AACCD8051F दर्शनसिंग राणा 1.01

Web Title: Income Tax Department discloses names of big defaulters