प्राप्तिकर विभागाचे देशभरात 50 ठिकाणी छापे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पुण्यातील 19 ठिकाणी केली छाननी

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने देशभरात पन्नास ठिकाणी छापे टाकून शंभर कोटी रुपयांपर्यंतचा काळा पैसा जप्त केला. या धडक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेला पैसा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) जमा करण्यात येणार आहे.

पुण्यातील 19 ठिकाणी केली छाननी

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने देशभरात पन्नास ठिकाणी छापे टाकून शंभर कोटी रुपयांपर्यंतचा काळा पैसा जप्त केला. या धडक कारवाईनंतर जप्त करण्यात आलेला पैसा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) जमा करण्यात येणार आहे.

"पीएमजीकेवाय'ची खिडकी नुकतीच बंद करण्यात आली होती. त्यानंतर काळा पैसाधारकांवर धडक कारवाई करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला. या कारवाईचा भाग म्हणून आज प्राप्तिकर विभागाने देशभरात पन्नास ठिकाणी छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदाबादस्थित बांधकाम व्यावसायिकांपासून छाप्यांच्या कारवाईला सुरवात केली. पुणे व परिसरामध्ये 19 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने कृषिमाल प्रक्रिया व व्यापारासंबंधी व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांना संबंधित समूहांची माहिती अद्याप मिळालेली नसून, यासंबंधी चौकशी सुरू आहे.

याच पद्धतीने राजकोट, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद आदी शहरांमधील 30 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या धडक कारवाईमध्ये काळ्या पैशासंबंधी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याचे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
काळा पैसाधारकांसाठीची "पीएमजीकेवाय'ची खिडकी बंद केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने प्रथमच मोठी कारवाई केली आहे. "पीएमजीकेवाय'ची खिडकी काळापैसा जमा करणाऱ्यांसाठी शेवटची संधी होती. त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

"पीएमजीकेवाय'अंतर्गत काळा पैसा जमा करण्याचे प्रमाण नगण्यच पाहायला मिळाले. कर विभागाच्या अपेक्षेपेक्षा जमा काळ्या पैशाचा आकडा कमी होता. दरम्यान, या धडक कारवाईसंदर्भात प्राप्तिकर विभाग किंवा त्यांचे जबाबदार अधिकारी, अथवा केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

Web Title: The Income Tax department raids across the country in 50