काँग्रेस खासदार हुक्केरी समर्थक ठेकेदारांच्या घरावर आयकरचे छापे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

एक नजर

  • काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रकाश हुक्केरी समर्थक  ठेकेदारांच्या घरावर प्राप्तिकर खात्याने छापे
  • चिक्कोडी व शिरगुप्पी येथील ठेकेदारांच्या घरावर एकाचवेळी छापे
  • गोवा येथून आलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाचा या छाप्यामध्ये समावेश
  • महत्वाच्या कागदपत्रांची चौकशी 

चिक्कोडी -  काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार प्रकाश हुक्केरी समर्थक  ठेकेदारांच्या घरावर आज सकाळी दहाच्या सुमारास प्राप्तिकर खात्याने छापे टाकले. चिक्कोडी व शिरगुप्पी येथील ठेकेदारांच्या घरावर एकाचवेळी छापे टाकले. गोवा येथून आलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाचा या छाप्यामध्ये समावेश आहे. यात महत्वाच्या कागदपत्रांची चौकशी करण्यात येत आहे.

चिक्कोडी येथील इंदिरानगर मधील रहिवासी ठेकेदार प्रकाश वंटमुत्ते यांच्या बंगल्यावर तर शिरगुप्पी येथील प्रथम दर्जा ठेकेदार आर. एस. पाटील यांच्या बंगल्यावर छापे टाकण्यात आले. भाजपकडून कॉंग्रेस उमेदवारांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप  कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.

"ठेकेदार कोणत्याही पक्षाचे समर्थक नाहीत. पण निवडणुकीच्या काळातच ते आपल्या बाजूने असल्याच्या संशयातून प्राप्तिकर खात्याने छापे टाकणे योग्य नाही. उद्देशपूर्वक छापे घालण्याचे काम कोणी करु नये. असे घडल्यास नागरिकांचा आक्रोष वाढण्याची शक्‍यता आहे.'

- प्रकाश हुक्केरी, कॉंग्रेस उमेदवार

"चिक्कोडी लोकसभा मतदार संघात छापे टाकून कॉंग्रेस उमेदवारांवर द्वेशाचे राजकारण करण्यात येत आहे. पण असे कितीही प्रयत्न केले तरी येथुन भाजपचे उमेदवार कदापी निवडून येणे शक्‍य नाही. चिक्कोडी येथील छापे हे ठेकेदाराशी संबधित असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचा धसका घेण्याचे कारण नाही.'
- महावीर मोहिते, 

ठेकेदार, सर्वसमावेशक नेते  

Web Title: Income Tax raids at the residence of Congress MP Hukkeri supporters