BBC IT Survey : 'बीबीसी'चं काय होणार? दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं सर्व्हेक्षण सुरूच | Income Tax survey operation will continue for the 2nd day at the BBC offices in Delhi and Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax survey operation will continue for the 2nd day at the BBC offices in Delhi and Mumbai

BBC IT Survey : 'बीबीसी'चं काय होणार? दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचं सर्व्हेक्षण सुरूच

BBC IT Survey : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) या प्रसारण संस्थेच्या भारतातील दिल्ली आणि कार्यालयांचं काल इन्कम टॅक्स विभागाकडून कर सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे.

तसेच यावरून उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. यानंतर आता आजही हे सर्व्हेक्षण सुरुच राहणार आहे. याबद्दलची माहिती संबंधीत सुत्रांनी दिल्याचं एएनआयने म्हटले आहे.

आयकर विभागाच्या या कारवाईवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. बीबीसीने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल इंडिया : द मोदी क्वेश्चन ही डॉक्यूमेंट्री सीरीज प्रसिध्द केली होती. बीबीसी कार्यालयांवर झालेल्या या कारवाईला याच्याशी जोडून पाहिले जात आहे.

यूके सरकारने काय म्हटलंय?

यावर आता युकेच्या सरकारनं अर्थात ऋषी सूनक सरकारने देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भारतातील बीबीसीच्या कार्यालयात केलेल्या कर सर्वेक्षणाच्या अहवालांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, असं युकेच्या सरकारी सुत्रांनी म्हटलं आहे.बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई इथल्या कार्यालयांवर सोमवारी सकाळी अचानक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं.

बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयावर आयकर विभगाने केलेल्या कारवाईदरम्यान इन्कम टॅक्सच्या आधिकऱ्यांनी बीबीसी कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले होते. ५० हून अधिक आधिकरी आणि कर्मचारी या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते.

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद

काही दिवसांपूर्वी बीबीसी या प्रसारण संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक डॉक्युमेंट्री युट्यूबवर रिलीज केली होती. यानंतर भारत सरकारनं ती तातडीनं हटवली होती. या डॉक्युमेंट्रीतून बीबीसीनं भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या या कृतीवर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली होती.