त्रास देण्याच्या हेतूनेच हेलिकॉप्टर चौकशी- रावत

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

डेहराडून- निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बेहिशेबी रोकड असल्याच्या कारणावरून चौकशी करण्याच्या घटनेचा उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी शनिवारी तीव्र आक्षेप नोंदविला. आपला त्रास देण्याचा केंद्र सरकारचा हेतू यामागे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हल्दवानी येथे शुक्रवारी (ता. 10) प्रचार करीत असताना रावत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बेहिशेबी रोकड असल्याच्या संशयावरून प्रशासनाने तपासणी केली. याचा निषेध रावत यांनी नोंदविला. भाजपच्या उमेदवारांना पैसे वाटण्यासाठी दिल्लीतील नेते हेलिकॉप्टरमधून रोकड आणत आहेत, असे असूनही आपल्याच हेलिकॉप्टरची चौकशी करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

भाजपच्या केंद्रातील नेत्यांना आयोगाकडून मिळणाऱ्या खास वागणुकीबद्दल त्यांनी आक्षेप नोंदविला, तसेच दिल्लीतील राजकीय विरोधकांच्या सूचनेनुसार आपल्याला त्रास दिला जात असल्याची टीका त्यांनी केली. ""भापजपने निवडणुकीत आतापर्यंत दोन हजार कोटी वाटले असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाने सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे,'' अशी अपेक्षा रावत यांनी व्यक्त केली.

Web Title: Inconvenience to the purpose helicopter in enquiry- Rawat