तमिळनाडूत लॉकडाउनचे निर्बंध पाळण्याने बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

corona
corona

चेन्नई -  तमिळनाडूत कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढत असताना मंगळवारी चार महिन्यांत प्रथमच बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात एका दिवसात तीन हजार ६१६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर चार हजार ५४५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

तमिळनाडूत पुन्हा लॉकडाउनची शक्यता मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी फेटाळली असली तरी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाख १८ हजार ५९४ झाली असून ७१ हजार ११६ जण बरे झाले आहेत. गेल्या चार महिने राज्यात लॉकडाउनचे निर्बंध पाळण्यात आल्याने विषाणूंचा प्रसार रोखण्यास मदत झाली आहे, असे पलानीस्वामी यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com