तळीराम वैमानिक 'हवेत' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : तुम्ही नियमित हवाई प्रवासी असाल, तर थोडे सावधान! देशात मद्यधुंद वैमानिकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. याची कबुली खुद्द केंद्र सरकारनेच राज्यसभेतील एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली आहे. यानुसार 2015 ते 2017 या काळात मद्यपान करून विमान चालविणाऱ्या वैमानिकांची संख्या 132 एवढी वाढली आहे. 

धीरज प्रसाद, महेश पोद्दार व शांतनू सेन यांनी मद्यधुंद वैमानिकांबाबत प्रश्‍न विचारला होता. त्याच्या उत्तरादाखल दिलेल्या माहितीत, नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी मद्यधुंद वैमानिकांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी एकूण वैमानिक संख्येच्या प्रमाणानुसार ही संख्या कमी असल्याचा दावा केला. ते म्हणाले, की ही संख्या दिसते आहे ते सरासरी 40 हजार वैमानिकांमागे एक मद्यधुंद, असे साधारणतः प्रमाण आहे. अर्थात, दारू पिऊन विमान उडविणे हा गुन्हाच असून, केंद्राने अशा वैमानिकांवर कठोर कारवाई केली आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वीच वैमानिकांची वैद्यकीय तपासणी होते. त्यात मद्य पिऊन आलेले वैमानिक पकडले जातील, त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी व नंतर सुधारणा न झाल्यास कायमचा रद्द केला जातो. सलग तीनदा मद्यधुंद स्थितीत आढळलेल्या एका वैमानिकाचा परवाना रद्द केला गेला आहे. याबाबतीत परदेशांतील वैमानिकांच्या तुलनेत भारताची स्थिती अजून बरीच चांगली आहे. याशिवाय परदेशातून आलेल्या विमानांच्या चालकांची विमान उतरल्यावरही वैद्यकीय तपासणी भारत करतो; कारण आंतरराष्ट्रीय विमानांत दारूही दिली जाते. 

आगामी काळात विमान प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता व्यापक उपाययोजना विचाराधीन आहेत. मात्र, केबीन क्रूसाठी मद्यपान चाचणी करण्याची व्यवस्था अद्याप नाही, असेही प्रभू म्हणाले. 

वाढते मद्यधुंद वैमानिक 
2015 : 43 
2016 : 44 
2017 : 47 

Web Title: Increased of number for pilots drinking and flying aircraft