भारतात मिझोराममध्ये 'एचआयव्ही'चा वाढता प्रसार

पीटीआय
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

ऐझाल (मिझोराम) : भारतात मिझोराममध्ये गेल्या वर्षी एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या रक्ततपासणीनंतर एचआयव्हीबाधितांची टक्केवारी 2.04 होती, असे राज्यातील एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या (एमएसअेसीएस) अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले. 

ऐझाल (मिझोराम) : भारतात मिझोराममध्ये गेल्या वर्षी एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या रक्ततपासणीनंतर एचआयव्हीबाधितांची टक्केवारी 2.04 होती, असे राज्यातील एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या (एमएसअेसीएस) अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले. 

मिझोराममध्ये ऑक्‍टोबर 1990 आणि यंदा ऑगस्टपर्यंत 11 लाख लोकसंख्येत 18 हजार 81 नागरिकांना (1.6 टक्का) एचआयव्हीबाधित असल्याचे आढळून आले. राज्यात 14 हजार 632 एचआयव्हीबाधित रुग्ण असल्याची माहिती गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी विधानसभेत देण्यात आली होती. देशात एचआयव्हीबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी पाच राज्यांमध्ये याचा प्रसार वाढत असून त्यात मिझोरामचा समावेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटनेने (एनएसीओ) प्रसिद्ध केलेल्या "एचआयव्ही अंदाज 2017' या अहवालात दिली आहे. 

या अहवालातील माहितीनुसार एचआयव्हीबाधितांच्या संख्या मिझोराममध्ये सर्वाधिक (2.04 टक्के) आहे. यानंतर मणिपूरचा क्रमांक (1.43 टक्का) असून नागालॅंड (1.15 टक्का) तिसऱ्या स्थानावर आहे. मिझोराममध्ये एचआयव्हीचा प्रसार वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध हे आहे.

तसेच उपचारासाठी अनेक रुग्णांसाठी एकच सुई व सीरिंज वापरणे, समलिंगी जोडीदारांमधील लैंगिक संबंध यामुळेही एचआयव्हीची लागण होऊ शकते. एचआयव्हीबाधितांमध्ये 42 टक्के रुग्ण 25 ते 34 वर्षे वयोगटातील, तर 26 टक्के रुग्ण 35 ते 49 वर्षे या गटातील आहेत, असे "एमएसअेसीएस'च्या अधिकाऱ्याने सांगितले. 

एचआयव्हीग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेली राज्ये (आकडेवारी टक्‍क्‍यांत) 

2.04 
मिझोराम 

1.43 
मणिपूर 

1.15 
नागालॅंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasingly spreading HIV in Mizoram