India Vs China: भारताचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून ‘ड्रॅगन’ला खडे बोल

चीन लिखित करारांचे पालन करत नसल्यामुळे ताबा रेषेवर तणाव वाढला आहे, असा आक्रमक हल्ला भारताने चढविला.
China–India relations
China–India relationssakal

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील कुरापती वाढल्याने संतप्त झालेल्या भारताने आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून ‘ड्रॅगन’ला खडे बोल सुनावले. चीन लिखित करारांचे पालन करत नसल्यामुळे ताबा रेषेवर तणाव वाढला आहे, असा आक्रमक हल्ला भारताने चढविला. (China Vs India)

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनवर शांतता भंगाचा आरोप केला. ‘क्वाड’ बैठकीत भारत चीन तणावावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेश सीमेपर्यंत चीनने लष्करी हालचाली वाढविल्याने प्रत्युत्तरादाखल भारतानेही मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटपटीनंतर तणाव आणखी वाढला आहे.

China–India relations
लैंगिक शोषण प्रकरणी अल्पवयीन बालिकेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

या तणावासाठी चीनच जबाबदार असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. सीमेवर सैन्य न आणण्याच्या लिखित कराराचे चीनने उल्लंघन केल्यामुळे ताबा रेषेवर ही स्थिती निर्माण झाली आहे, असे जयशंकर यांनी बजावले. तसेच या तणावाबाबत क्वाड समूहामधील सहकारी देश अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या विषयाकडे भारत- प्रशांतमधील अनेक बड्या देशांचे लक्ष आहे. एखादा बडा देश जर लिखित करार धुडकावत असेल तर हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचा विषय असतो, असे ते म्हणाले.

याआधीही निवेदन

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश असलेला क्वाड समूह खुल्या आणि मुक्त प्रशांत भारत क्षेत्रासाठी आग्रही आहे. कालच क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करताना भारत प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये समन्वय, या क्षेत्रातील संभाव्य धोक्यांबाबत माहितीचे आदान प्रदान, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा संयुक्त मुकाबला, दशतवाद्यांचे जाळे नष्ट करणे आणि त्यांना अर्थपुरवठा करणारे मार्ग बंद करणे यावर भर दिला होता. भारत-प्रशांत क्षेत्र खुले, सर्वसमावेशक असावे, या क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी क्वाड देश संघटितपणे काम करतील असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com