Composite Cylinder : स्मार्ट सिलिंडर रोखणार गॅस चोरी; शिल्लक गॅसही सांगणार

बाजारात असा एक गॅस सिलिंडर लाँच करण्यात आला असून, त्यातून कोणी गॅस चोरल्यास युजरला लगेच कळेल.
Composite Cylinder
Composite Cylinderesakal
Summary

बाजारात असा एक गॅस सिलिंडर लाँच करण्यात आला असून, त्यातून कोणी गॅस चोरल्यास युजरला लगेच कळेल.

एकीकडे वाढत्या महागाईमुळे किचनची चव बिघडली आहे, तर गॅस सिलिंडरमधून कमी होत जाणारा गॅस लोकांचा मूड खराब करतोय. तुम्ही कितीही सतर्क असलात तरी काही डिलिव्हरीबॉय तुम्हाला लो-गॅस सिलिंडर देतात आणि चुना लावतात. मात्र आता गॅस चोरीचे टेन्शन येणार नाही. बाजारात असा एक गॅस सिलिंडर लाँच करण्यात आला असून, त्यातून कोणी गॅस चोरल्यास युजरला लगेच कळेल.

Composite Cylinder
LPG Cylinder : आता मिस्ड काॅलवर मिळेल गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसे ?

आम्ही कंपोझिट सिलिंडरबद्दल (Composite Cylinder) बोलत आहोत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) गॅस कंपनी इंडेनने कॉम्पोझिट गॅस सिलिंडर बाजारात आणले आहेत. याला स्मार्ट किचनचे स्मार्ट सिलिंडर असेही म्हणतात. त्याच्या स्मार्टनेसबद्दल बोलायचं झालं तर कम्पोझिट सिलिंडरमुळे सिलिंडर संपल्यावर तुम्हाला जो त्रास होईल तो होणार नाही. कारण, इंडेन कम्पोजिट सिलिंडरचं वैशिष्ट्य म्हणजे गॅस किती शिल्लक आहे आणि किती खर्च झाला आहे, हे तुम्हाला कळेलच. या वैशिष्ट्यामुळे गॅस चोरीला गेला तरी कळणार आहे.

जुन्या सिलिंडरच्या बदल्यात कम्पोझिट सिलिंडर घेता येणार-

आपल्या सामान्य सिलिंडरच्या बदल्यात आपण कंपोझिट सिलिंडर घेऊ शकता. तुम्हाला तुमचा सामान्य एलपीजी सिलिंडर द्यावा लागेल आणि त्या बदल्यात कंपोझिट सिलिंडरचे कनेक्शन आपल्या नावावर जारी केले जाईल. मात्र यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त सुरक्षा पैसे जमा करावे लागतील. कंपोझिट सिलिंडर 5 आणि 10 किलोमध्ये उपलब्ध आहे. पाच किलोच्या सिलिंडरची सिक्युरिटी 2150 रुपये आहे. 10 किलोच्या सिलिंडरसाठी तुम्हाला सिक्युरिटी म्हणून 3350 रुपये जमा करावे लागतील.

Composite Cylinder
सर्वसामान्यांना दिलासा! LPG सिलिंडर झाला स्वस्त

सामान्य सिलिंडरप्रमाणेच कंपोझिट सिलिंडरही वितरित केला जातो. 10 किलोचा कंपोझिट सिलिंडर 634 रुपयांना भरता येणार आहे. हा सिलिंडर केवळ घरगुती विना अनुदानित वर्गासाठी आहे. पाच किलो वजनाचे कंपोझिट सिलिंडर विनाअनुदानात (विना सबसिडी) उपलब्ध आहे.

कम्पोझिट सिलिंडरची खासियत-

इंडेन कंपोझिट सिलिंडर सामान्य सिलिंडरपेक्षा खूपच हलका असतो. त्यांचे वजन लोखंडाच्या सिलिंडरच्या तुलनेत निम्मे आहे. सिलिंडरचा काही भाग पारदर्शक असतो. हा सिलिंडर ब्लो-मोल्डेड हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE) इनर लायनरपासून बनलेला आहे, जो पॉलिमर-गुंडाळलेल्या फायबर ग्लासच्या (Fibre Glass)थराने झाकलेला आहे. यात HDPE आऊटर जॅकेट फिट केले आहे. त्यामुळे कंपोझिट सिलिंडर गंजत नाही आणि फरशीवरही ट्रेस होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com