भारतीय महिला पायलट उडवणार मिग विमाने

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नवी दिल्ली - येत्या काही दिवसात पहिल्यांदाच भारतीय महिला पायलट सुपरसॉनिक फायटर जेट विमाने उडविणार आहे. भारतीय हवाई दलातील अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशा तीन महिला वैमानिकांनी नुकतेच फायटर पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. 

आतापर्यंत या तिघींनी पायलॅटस पीसी-7, टर्बोप्रॉप्स, किरन आणि हॉक जेट ट्रेनर्स ही विमाने चालवली आहेत. आता अवनी आणि भावना मिग-21 बिसन्स हे विमान उडवणार आहेत. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अवनीने दोन सीट्स असणाऱ्या मिग-21 टाइप 69 ट्रेनर विमानात 'क्वालिफाइड फायटर इंस्ट्रक्टर'कडून प्रशिक्षण घेतले आहे. भावनादेखील अंबाला एअरबेसवर हे प्रशिक्षण घेणार आहे. मोहना हॉक अॅडव्हान्स्ड जेटचे प्रशिक्षण कलाइकुंड एअरबेसवर घेत आहे. 

मिग-21 संपूर्ण प्रशिक्षण घेण्यासाठी जवळपास एक र्षांचा कालावधी लागते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तो फायटर पायलट पूर्णपणे ऑपरेशनल झाल्याची घोषणा केली जाते. अवनी, भावना आणि मोहनाने जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे. 

Web Title: India’s first-ever women fighter pilots gear up for solo MiG-21 flights