लसीकरणात जगात भारतच भारी! अमेरिका-ब्रिटननंतर लस तरी गाठला मोठा पल्ला

corona vaccination.jpg
corona vaccination.jpg

नवी दिल्ली- भारतात 16 जानेवारीपासून जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेस सुरुवात झाली होती. या अभियानाला एक महिना पूर्ण झाला आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत सरकारने 88.57 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. यामध्ये सव्वा दोन लाख जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. या एक महिन्यात भारताने सर्वाधिक कोरोना लस देण्याच्या स्पर्धेत 11 व्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 16 जानेवारीला देशात 1.91 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली होती. त्या दिवशी भारत 11 व्या स्थानी होता. विशेष म्हणजे ब्रिटन, जर्मनी आणि इटलीसारख्या देशांमध्ये भारतापूर्वी लसीकरणास सुरुवात झाली होती. परंतु, आज भारत त्यांच्या पुढे गेला आहे. 

अमेरिकेत 14 डिसेंबरपासून लसीकरणास सुरुवात झाली होती. त्यांना 90 लाख लोकांना लस देण्यास 35 दिवस लागले होते. ब्रिटनमध्ये 8 डिसेंबरला लसीकरणास सुरुवात झाली आणि 90 लाख लोकांना लस देण्यास त्यांना 50 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला. त्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने भारतात लसीकरण झाले आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली आणि 30 दिवसांत सुमारे 90 लाख लोकांना लस देण्यात आली. एक चांगली गोष्ट अशी आहे की, भारताची लस आतापर्यंत सुरक्षित आढळली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, 16 फेब्रुवारीपर्यंत फक्त 36 असे लोक होते, ज्यांना लस दिल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले होते. लस दिल्यानंतर 29 लोकांचा मृत्यूही झालेला आहे. 

कोरोनाची लस आधी कोणाला द्यायची, याचा प्राधान्यक्रम सरकारने डिसेंबरमध्येच निश्चित केला होता. या यादीत 30 कोटी लोकांचा समावेशे करण्यात आला आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सबरोबर 27 कोटी असे लोक असतील ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आणि गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. 

देशात सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. तिथे 9.34 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 18 हजारहून अधिक लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 7.26 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. 

देशात सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. तिथे 9.34 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. यामद्ये 18 हजारहून अधिक लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 7.26 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीला आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना लोकसभेत सांगितले होते की, आतापर्यंत 1.74 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांनीच कोविन-ऍपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या हिशोबाने सरकारने 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यामध्ये 58 टक्के लोकांनीच लसीसाठी नोंदणी केली आहे. 

यात थोडीशी अडचण अशी आहे की, सरकारने ऑगस्ट 2021 पर्यंत 30 कोटी जणांना लस देण्याचे उद्धिष्ट ठेवले आहे. आता ज्या वेगाने लसीकरण होत आहेत. त्याच वेगाने लसीकरण झाले तर ऑगस्टपर्यंत सुमारे 7 कोटी लोकांनाच लस दिली जाईल. म्हणजेच ऑगस्टपर्यंत केवळ 7 कोटी लोकच असे असतील ज्यांना कोरानाचे दोन डोस मिळालेले असतील.

लसीकरणावर किती खर्च ?
यावर्षी अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी तरतूद केली आहे. 5 फेब्रुवारीला सरकारने लोकसभेत सांगितले की, त्यांनी आतापर्यंत लसीकरणासाठी 1.65 कोटी डोस खरेदी केले आहेत. यामध्ये 1.10 कोटी डोस कोविशील्ड आणि 55 लाख डोस कोव्हॅक्सिनचे आहे. ती खरेदी करण्यासाठी सरकारने 350 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर 9 फेब्रुवारीला लोकसभेत दिलेल्या उत्तरात सरकारने म्हटले होते की, 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यासाठी 480 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर 1392 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

20 देशांना भारताने 2 कोटीपेक्षा जास्त डोस पुरवले
जगात भारत लशीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात दरवर्षी 2.3 अब्ज लसींचे डोस तयार होतात. जगभरातील प्रत्येक तीनपैकी दोन मुलांना देण्यात येणारी लस ही भारतात तयार होते. त्यामुळे कोरोनाच्या लसीसाठी जगभरातील देश भारताकडे मोठ्या आशेने पाहत होते. विदेश मंत्रालयाच्या मते, आतापर्यंत 20 देशांना कोरोना लसीचे 2.29 कोटी डोस पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 65 लाख डोस मदतीच्या रुपाने दिले आहेत. तर 1.65 कोटी लसी विकण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com