पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह नेण्याची भारताने दिली ऑफर; पण...

पीटीआय
रविवार, 4 ऑगस्ट 2019

भारतीय जवानांनी ठार मारलेल्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानने घेऊन जावेत, मात्र ते नेताना आधी पांढरे निशाण दाखवावे, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय जवानांनी ठार मारलेल्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानने घेऊन जावेत, मात्र ते नेताना आधी पांढरे निशाण दाखवावे, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. 

पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्‍शन टीमने (बॅट) 31 जुलैच्या रात्री जम्मू-काश्‍मीरच्या केरन सेक्‍टरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने तो उधळून लावत पाच जणांना ठारही मारले. या पाच जणांचे मृतदेह परत नेण्याचे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. हे मृतदेह भारतीय भागात पडलेले दिसत आहेत. पाकिस्तानच्या "बॅट'मध्ये सैनिक आणि दहशतवाद्यांचा भरणा असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India asks Pakistan to take bodies after foiled infiltration bid