भारत आणि चीनमध्ये पुढील आठवड्यात बैठक

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

बीजिंग - भारत आणि चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पुढील आठवड्यात बैठक होत असून, यामध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अणु पुरवठादार गटातील भारताच्या समावेशाला आणि दहशतवादी मसूद अजहरवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेत चीनने आडकाठी आणल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होणार आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांग जेईची यांची पुढील आठवड्यात हैदराबाद येथे भेट होणार आहे. अणु पुरवठादार गटातील भारताचा समावेश रोखण्याबरोबरच चीनने मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात दुसऱ्यांदा तांत्रिक मुद्दा उपस्थित करत अडथळा आणला आहे. याशिवाय चीनकडून पाकिस्तानमध्ये बांधला जात असलेला आर्थिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्‍मीरमधून जात असल्याबाबतही वाद आहेत. पाकिस्तानमुळे भारत आणि चीन संबंधांमध्ये तणाव येत आहेत. चिनी मालावर भारतात बंदीची होत असलेली मागणी, भारत-अमेरिका वाढते संबंध आणि दलाई लामांचा अरुणाचल प्रदेशचा आगामी दौरा यावरूनही चीन आणि भारतामध्ये वाद आहेत.

Web Title: India-China meeting in next week