भारत-चीन संबंध जगासाठी प्रेरणादायी - नरेंद्र मोदी

पीटीआय
रविवार, 10 जून 2018

सामंजस्य करारांवर सह्या 
मोदी आणि जिनपिंग यांच्यादरम्यान आज झालेल्या भेटीत भारत आणि चीन यांच्यामध्ये सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या. या भेटीत वुहान येथे पार पडलेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांवरील अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आणखी मजबूत करण्यासंबंधीही चर्चा झाली. 

किंगदाओ: भारत आणि चीन या दोन देशांमधील भक्कम आणि स्थिर संबंध जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा देतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील किंगदाहो येथे व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी आज चीनच्या किंगदाओ येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याबाबतच्या अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग अत्यंत उत्साहात भेटले. या वेळी पंतप्रधानांनी वुहान येथील शी यांच्या अनौपचारिक भेटीचीही आवर्जून आठवण काढली. वुहान येथील अनौपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी भारत-चीन संबंध अधिक भक्कम करण्यावर भर दिला. त्यानंतर सहा महिन्यांनंतर या दोन नेत्यांची पुन्हा एकदा भेट झाली. गेल्या वर्षी डोकलाम प्रकरणानंतर सीमेवर चांगला समन्वय व्हावा; तसेच द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत व्हावेत, उद्देशाने वुहान येथे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली होती. यांनी आज एससीओचे महासचिव राशिद अलीमोव्ह यांचीही भेट घेऊन संघटनेशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केली. अलीमोव्ह यांनी या वेळी एससीओमधील भारताच्या योगदानाची स्तुती केली. 

सामंजस्य करारांवर सह्या 
मोदी आणि जिनपिंग यांच्यादरम्यान आज झालेल्या भेटीत भारत आणि चीन यांच्यामध्ये सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या. या भेटीत वुहान येथे पार पडलेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांवरील अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आणखी मजबूत करण्यासंबंधीही चर्चा झाली. 

Web Title: India-China strong relationship can give inspiration to the world says Modi