corona update: 24 तासात 163 जणांचा मृत्यू; 10 लाखांपेक्षा अधिकांचे लसीकरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 14,545 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून 18,002 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासाच 163 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली आहे. 

देशात आतापर्यंत 1,06,25,428 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 1,02,83,708 रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. देशात सध्या 1,88,688 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत 1,53,032 लोकांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 21 जानेवारीपर्यंत देशात 10,43,534 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस दिली जात आहे. देशात जवळपास 3 कोटी आरोग्य कर्मचारी असून या सर्वांना सरकारकडून मोफतमध्ये लस दिली जाणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona virus update 163 patient dies 10 lakh vaccinated