COVID 19 : 24 तासांत 80487 नवे रुग्ण; 3300 मृत्यू

corona_204_3.jpg
corona_204_3.jpg

coronavirus in india, covid-19, latest updates : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात 80 हजार 487 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3300 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत देशात एक लाख 32 हजार 576 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लागोपाठ महिनाभरपासून कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आढळत आहे. यामळे उपराचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 55 हजार 450 ने कमी झाली.

शनिवारी देसात 80 हजार 834 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 71 दिवसानंतर ही सर्वात कमी वाढ आहे. देशातील कोरोनाची लाट ओसरत असल्याचं यावरुन दिसत आहे. देशातील सध्याच्या दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 4.25% इतका आहे. लागोपाठ 20 व्या दिवशी देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्केंपेक्षा कमी आहे. देशाचा रिकव्हरी रेटही वाढत आहे. शनिवारी देशातील रिकव्हरी रेट 95.26 टक्के इतका झाला आहे.

corona_204_3.jpg
डोंबिवलीत आज पेट्रोल फक्त एक रुपया लीटर

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण (Total cases): 2,94,39,989

एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,80,43,446

एकूण मृत्यू (Death toll) : 3,70,384

उपचाराधीन रुग्ण (Active cases): 10,26,159

एकूण लसीकरण (Total vaccination) : 25,31,95,048

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज, देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या दहा लाखांच्या खाली येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लाट ओसरल्याचं हे एकप्रकारचं लक्षण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com