Corona Updates: नव्या रुग्णसंख्येत घट; मृतांमध्ये पुन्हा वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona-updates

गुरुवारी नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढली आहे.

Corona Updates: नव्या रुग्णसंख्येत घट; मृतांमध्ये पुन्हा वाढ

Corona Updates : नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या वातावरणामुळेही रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वारंवार चढउतार होत आहेत. गुरुवारी (ता.२०) दिवसभरात २ लाख ५९ हजार ५९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ४ हजार २०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ३ लाख ५७ हजार २९५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (India Coronavirus Updates above 2 lakh 59 thousand new cases found on Thursday 20th May 2021)

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

याआधी बुधवारी २.७६ लाख, मंगळवारी २.६७ लाख, सोमवारी २.६३ लाख नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढली आहे. आतापर्यंत देशातील २ लाख ९१ हजार ३३१ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३० लाख २७ हजार ९२५ जण कोरोनावरील उपचार घेत आहेत.

हेही वाचा: हवाई दलाचे लढाऊ विमान मिग 21 कोसळले

गुरुवारी दिवसभरात २० लाख ६१ हजार ६८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशातील ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात ४८ लाख, ६९ हजार ७११ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

देशातील कोरोना सद्यस्थिती -

एकूण कोरोना रुग्ण - २,६०,३१,९९१

एकूण कोरोनामुक्त - २,२७,१२,७३५

उपचाराधीन रुग्ण - ३०,२७,९२५

एकूण मृत्यू - २,९१,३३१

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image
go to top