corona updates: मागील 24 तासांत देशात कोरोनाचा कहर; उच्चांकी रुग्णवाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 17 September 2020

मागील दोन दिवसात भारतात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसले होते. पण मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा लाखाच्या जवळ गेला आहे. तसेच आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 51 लाखांच्या वर गेला आहे.

नवी दिल्ली: मागील दोन दिवसात भारतात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसले होते. पण मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा लाखाच्या जवळ गेला आहे. तसेच आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 51 लाखांच्या वर गेला आहे. दिवसेंदिवस कोरोचा कहर भारतात वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 97 हजार 894 रुग्ण वाढले असून 1,132 नवीन कोरोनाच्या रुग्णांचं निदान झालं आहे. कालची कोरोनाचा आकडा धरुन देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 51 लाख 18 हजार 254 वर गेला आहे. सध्या देशात 10 लाख 9 हजार 976 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 40 लाख 25 हजार 80 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत देशात 83 हजार 198 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

काल एका दिवसात जवळपास 83 हजार कोरोनामुक्त झाले आहेत. भारतातील कोरोनाचे रुग्ण 40 लाखांवरुन 50 लाखांवर जायला फक्त 11 दिवस लागले आहेत. ही आतापर्यंतची सगळ्यात कमी दिवसात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आहे. कारण यापुर्वी 10 लाख कोरोना रुग्णवाढीस यापेक्षा जास्त दिवस लागले होते. तसेच सध्या देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.63 टक्के आहे. 

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस; पुतीन, केपी ओली यांच्यासह राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा

 

इकडं महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 23 हजार 365 रुग्णांचं निदान झालं, तर 447 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या वर गेला आहे तर सध्या 3 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 82 हजार 172 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 

राज्यसभेत संजय राऊत यांच्याकडून ठाकरे सरकारची पाठराखण, विरोधकांसह केंद्राला झापले

बुधवारी एका भारतात दिवसात 11 लाख 36 हजार 613 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने  ( Indian Council of Medical Research) दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India covid19 updates corona spread at peak