अमेरिकेसारखी कारवाईची क्षमता भारतात नाही : चिदंबरम

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : ''मुंबईवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी हाफिज सईद कराचीतील सुरक्षितस्थळी होता. मात्र, आता तो सहजरित्या फिरत आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. मात्र, तशी क्षमता भारतामध्ये नाही'', असे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले.  

चिदंबरम म्हणाले, ''ज्यावेळी मुंबईवर हल्ला झाला होता. त्यावेळी आपल्याकडे तशी क्षमता नव्हती. तसेच आज आपल्याकडे तशी क्षमता असल्यास ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब असेल. तसेच अमेरिकेने ज्याप्रकारे कारवाई केली तशी कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्हाला अपयश आले असते. या अपयशाचा फटका बसला असता''. 

दरम्यान, 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्याचा भारताकडून खात्मा केला जातो. तसेच अमेरिकेने ज्याप्रकारे दहशतवादी ओसामा लादेनविरोधात कारवाई केली होती. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतातामध्ये आहे, असे विधान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले होते. त्यांच्या या विधाननंतर चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले.

Web Title: India does not have the ability to act like America says P Chidambaram