काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून PM मोदींचा निशाणा

काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून PM मोदींचा निशाणा
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेला 46 वर्षे झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेला 46 वर्षे झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका केली आहे. देशात 25 जून 1975 रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी जवळपास 21 महिने म्हणजेच 21 मार्च 1977 पर्यंत लागू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, आणीबाणीचे काळे दिवस कधीच विसरता येणार नाहीत. 1975 ते 1977 या काळात अनेक संस्थानांचा विद्ध्वंस झाला. आपण भारताच्या लोकशाहीची भावना भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. असं आवाहनही मोदींनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर भाजपच्या इन्स्टाग्राम अकाउंटची एक लिंक शेअर करताना म्हटलं की, काँग्रेसनं आपल्या लोकशाहीला अशा प्रकारे तुडवलं. आम्ही त्या सर्व महान लोकांचे स्मरण करतो ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारताच्या लोकशाहीचं संरक्षण केलं.

काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून PM मोदींचा निशाणा
मोदींच्या राजवटीतील अघोषित आणीबाणी

भाजपच्या अनेक नेत्यांनी आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही काही ट्विट केली आहेत. यात म्हटलं की, 1975 मध्ये आजच्या दिवशी काँग्रेसनं सत्तेसाठी आणि अहंकाराच्या भावनेतून देशावर आणीबाणी लादली. या कृतीने जहातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती असंही शहा यांनी म्हटलं.

काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून PM मोदींचा निशाणा
आणीबाणी - तेव्हाचा वरवंटा नि आत्ताचा कांगावा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं की, 1975 मध्ये आजच्याच दिवशी काँग्रेसनं राजकीय स्वार्थासाठी आणीबाणीची घोषणा केली होती. भारताच्या महान लोकशाहीवरचा हा काळा डाग आहे. आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महान लोकांना प्रणाम. अत्याचार सहन केला पण त्यांनी लोकशाहीची मूल्ये जपली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com