कुलभूषण जाधव यांना मिळणार भारतीय दूतावासाची मदत

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

तीन वर्षांपासून होती मागणी

कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे आदेश आयसीजेने पाकिस्तानला दिले होते. तसेच तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.

नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून देण्यासाठी पाकिस्तान आता तयार झाला आहे, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली.

कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) दिला. त्यानुसार पाकिस्तान सरकार कुलभूषण जाधव यांना मदत देण्यास तयार झाला आहे. आयसीजेच्या निर्णयानुसार उद्या (शुक्रवार) भारतीय दुतावासाची मदत दिली जाणार असून, कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

तीन वर्षांपासून होती मागणी

कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे आदेश आयसीजेने पाकिस्तानला दिले होते. तसेच तीन वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India To Evaluate Pak Offer Of Consular Access To Kulbhushan Jadhav