आता ड्रोन करतील औषधांची घरपोच डिलीव्हरी, पहिली चाचणी लवकरच

Drone
DroneGoogle

बंगळुरु : येत्या काही दिवसात आपल्याला औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता उरणार नाही. कारण देशातील पहिला व्हिज्युअल लाईनच्या पलीकडे (BVLOS) ड्रोनच्या (Drone) मदतीने औषधांची डिलीव्हरी करण्याच्या प्रयोगाची पहिली ट्रायल ही बंगळुरुपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूरमध्ये सुरू होणार आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास आपल्याला थेट ड्रोनच्या मदतीने औषधे घरपोच मिळणार आहेत. (India first medical drone delivery trials starts from June 18)

बेंगळुरू येथील थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स (TAS) या कंपनीला मार्च 2020 मध्ये नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) कडून वस्तू ड्रोनच्या सहाय्याने डिलीव्हर करण्यासंबंधीची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे इतर काही परवानग्या न मिळाल्याने हा प्रयोग रखडला होता. मात्र आता या संस्थेला आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर 18 जूनपासून 30-45 दिवसांमध्ये चाचण्यांचा पहिला सेट पार पाडणार आहे. प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी या चाचण्यांना पाठिंबा दर्शविला असून नारायण हेल्थ हे टीएएसबरोबर भागीदारी करणार आहेत. या चाचण्या दरम्यान वाहतुकीसाठी वापरले जाणारी औषधे त्यांच्याकडून पुरवली जाणार आहेत.

टीएएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेन्द्रन कंदासामी यांनी सांगितले की, इतर दोन कॉन्सोर्सियांना देखील या चाचण्या घेण्यास परवानगी मिळाली आहे पण आमचा प्रयोग हा पहिला अधिकृत/कायदेशीर प्रयोग असेल. यात 2016 पासून आम्ही बरीच प्रगती केली असून बऱ्याच प्रतीक्षेनंतर आम्हाला BVLOS बीव्हीएलओएस प्रयोग मॉनिटरींग कमिटी (BEMC) कडून या प्रयोगांसाठी परवानगी मिळाली आहे आणि भारतात लवकरच व्यावसायिक ड्रोन डिलीव्हरीचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत.

Drone
काँग्रेसची डोकेदुखी वाढणार; पायलट गटाचा फोन टॅपिंगचा आरोप

या प्रयोगांदरम्यान कन्सोर्टियम त्यांच्या ड्रोनचे दोन व्हेरियंट वापरेल. मेडकोप्टर (MedCOPTER) आणि टीएएस (TAS)ऑन डिमांड सॉफ्टवेअर रेनडिंट (RANDINT) हे या प्रयोगादरम्यान वापरले जाईल. यापैकी लहान व्हेरियंट असलेले मेडकोप्टर हा ड्रोन 1 किलो वजन 15 किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो तर दुसरा व्हेरियंट हा 2 किलो वजन 12 किलोमिटर अंतरापर्यंत घेऊन जातो. 30-45 दिवसांपर्यंत या ड्रोनच्या रेंज आणि सेफ्टीबद्दल चाचणी करीत आहोत. त्यादरम्यान डीजीसीएनुसार आम्हाला किमान 100 तास उड्डाण करावे लागेल. सुमारे 125 तास उड्डाण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ट्रायलच्या शेवटी नोंदी पुनरावलोकन अधिकाऱ्यांना सादर केल्या जातील, असे कंदासामी म्हणाले.

Drone
भारतीय मुस्लिम यंदाही हज यात्रेला मुकणार

कंदासामी यांनी स्पष्ट केले की नारायण हेल्थची भागीदारी ही ड्रोनच्या सहाय्याने कोणत्या प्रकारच्या औषधांची वाहतूक केली जाऊ शकते, कोणती आव्हाने असू शकतात आणि भविष्यातही याचा नियमित वापर केला जाऊ शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी असेल.आमच्या सॉफ्टवेअरला नारायण हेल्थकडून करण्यात आलेली मागणीचा प्राप्तकर्ता कोण आहे हे कोणालाही माहिती होणार नाही, परंतु डिलीव्हरी ही आधी लोड केलेल्या पत्त्यावर केले जाईल असे कंदासामी यावेळी स्पष्ट केले.

(India first medical drone delivery trials starts from June 18)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com