देशातील हरितपट्टा होतोय समृद्ध

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

अहवालानुसार देशातील एकूण भूभागापैकी वनाच्छादित भाग सात लाख आठ हजार 273 चौरस मीटर आहे तर वन व वृक्ष लागवडीखालील भाग आठ लाख दोन हजार 88 चौरस मीटर आहे. जगभारात वनाच्छादित जमिनीचे प्रमाण कमी होत असताना भारतात वनाखालील भूभागात वाढ होत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे

नवी दिल्ली - देशातील वन व वृक्ष लागवडीखालील जमिनीत गेल्या दोन वर्षांत आठ हजार 21 चौरस मीटरने वाढ झाली असल्याचे सरकारी मूल्यांकन अहवालात म्हटले आहे. "देशातील वनांची स्थिती 2017' या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन आणि राज्य मंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते आज (सोमवार) झाले.

भारतातील एकूण वनाच्छादित भाग आठ लाख चौरस मीटर आहे. एकूण भूभागाच्या 24. 39 टक्के आहे. अहवालानुसार देशातील एकूण भूभागापैकी वनाच्छादित भाग सात लाख आठ हजार 273 चौरस मीटर आहे तर वन व वृक्ष लागवडीखालील भाग आठ लाख दोन हजार 88 चौरस मीटर आहे. जगभारात वनाच्छादित जमिनीचे प्रमाण कमी होत असताना भारतात वनाखालील भूभागात वाढ होत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे. या गटात जागतिक पातळीवर देशाचा दहावा क्रमांक आहे, असे वर्धन यांनी प्रकाशनाच्या वेळी सांगितले. या वेळी प्रथमच जलसाठ्यांचाही सर्व्हे करण्यात आला.

Web Title: india forest cover