नेहरुंमुळेच आज 'चहावाला' देशाचा पंतप्रधान: थरुर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते.

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान लाभल्याचे, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी म्हटले आहे.

शशी थरूर हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताता. पंडित जवाहरलाल नेहरु यांचे देशाच्या विकासातील योगदान या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे. नेहरुंच्या जयंतीनिमित्त नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. थरूर यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

थरुर म्हणाले, की आपल्या देशाला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते. मंगलयानाच्या माध्यमातून भारत मंगळावर पोहोचण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, या अवकाश संसोधन संस्थेची अर्थात इस्रोची स्थापना नेहरुंनीच केली. गरीब भारतीयांना अवकाशातील मोठी स्वप्ने पहायची त्यांनी ठरवले. नेहरुंनी आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थांची निर्मिती केली. या माध्यमातून अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये 40 टक्के भारतीय तरुण काम करीत आहेत संयुक्त लोकशाही आणि भारतीय राजकारणातील राजकीय महत्त्व ही नेहरुंचीच देणगी आहे.

Web Title: India has chaiwala as PM because of Nehru says Shashi Tharoor