esakal | केंद्र सरकारमुळे देश हजारो वर्षे मागे गेला; लालू प्रसादांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav

केंद्र सरकारमुळे देश हजारो वर्षे मागे गेला; लालू प्रसादांची टीका

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी सोमवारी पक्षाच्या स्थापनादिनी तीन वर्षांनंतर लालू प्रसाद यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने मार्गदर्शन (Guidance) केले. केंद्र सरकारची धोरणे (Central Government Policy) देशासाठी चिंताजनक असल्याचे सांगत यामुळे देश हजारो वर्ष मागे गेला, अशी टीका केली. सामाजिक भेदांवरुन होणारे हल्ले धोकादायक असल्याचेही ते म्हणाले. (India has Gone Back Thousands of Years Central Government Comment Lalu Prasad Politics)

रांचीच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लालू प्रसाद हे सध्या दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार घेत आहेत. पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त त्यांनी रुग्णालयातून ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘देशापुढे सध्या कठीण अवस्था आहे. रोजगाराचे आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. नोटबंदीमुळे देश हजारो वर्षे मागे गेला आहे. अयोध्यानंतर आता मथुरेच्या घोषणा दिल्या जात आहेत.’’ पूर्वी गरिबांना बसमध्ये पहिल्या आसनावर बसू दिले जात नसे. अशा भेदभावांविरोधात सामाजिक लढा सुरूच राहिला अन त्यातून मंडल आयोग लागू झाला. परंपरेने चालत आलेल्या सत्ताधीशांच्या आसनावर गरीब बसला तर त्याला ‘जंगलराज’ असे हिणवले, असे ते म्हणाले.

हेही वाचा: काँग्रेसला मोठा दणका; प्रणव मुखर्जींचे पुत्र 'तृणमूल'मध्ये

राबडीदेवी नसत्या तर...

लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव याचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीत त्याने मेहनत घेतली आणि ‘आरजेडी’ला बिहारमधील सर्वांत मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित केले, असे लालूंनी म्हटले. रांचीला मी आजारी होते, तेव्हा पत्नी राबडीदेवी तातडीने दिल्लीला आल्या नसत्या तर मी तेथेच संपलो असतो, असे ते म्हणाले. लवकरच बिहार परतणार असल्याची ग्वाहीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

loading image