Corona Updates: दिलासादायक! जगभरात भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आणि मृत्यूदरही सर्वात कमी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 14 October 2020

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 730 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 63 हजार 509 रुग्णांचे निदान झाले आहे.

नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 730 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 63 हजार 509 रुग्णांचे निदान झाले आहे. सोमवारी देशात कोरोना 60 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले होते. आतापर्यंतचा देशातील कोरोनाची रुग्णांचा आकडा 72 लाख 39 हजार 360 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 63 लाख 1 हजार 928 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

 सध्या देशात 8 लाख 26 हजार 876 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत देशात 1 लाख 10 हजार 586 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे.   

भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक-
जगभरात प्रति 10 लाखांमागे 4 हजार 794 आढळले आहेत. तर भारतामध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 5 हजार 199 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ब्रिटन (8893), रशिया (8992), फ्रान्स (10,838), दक्षिण आफ्रिका (11,675), अमेरिका (23,072) आणि सर्वाधिक ब्राझीलमध्ये ( 23,911) या देशांत प्रति 10 लाखांमागे कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

हेही वाचा- काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता

मृत्यूदरही सर्वात कमी-
तसेच कोरोनाने झालेल्या मृत्यूमध्येही भारतात जागतिक क्रमवारीच्या दृष्टीने न्यूनत्तम मृत्यू झाले आहेत. जागतिक स्तरावर प्रति 10 लाखांमागे 138 मृत्यू झाले आहेत तर भारतात 79 मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये सर्वाधिक प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

मंगळवारी देशात कोरोनाच्या 11 लाख 45 हजार 15 चाचण्या झाल्या आहेत. तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या 9 कोटी 90 हजार 122 चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india has highest recovery rate in the world