'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव

सोमवार, 29 जून 2020

भारत आणि जपानच्या युद्धनौकांनी हिंद महासागरामध्ये शनिवारी (ता. २७) संयुक्त सराव केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील घोषणा दोन्ही देशातील नौदल अधिकाऱ्यांनी केली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि जपानच्या युद्धनौकांनी हिंद महासागरामध्ये शनिवारी (ता. २७) संयुक्त सराव केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील घोषणा दोन्ही देशातील नौदल अधिकाऱ्यांनी केली आहे. भारत आणि जपानच्या नौदलाचे संयुक्त युद्ध अभ्यास अनेकदा होत असतात. मात्र, सध्या चीन आणि भारतादरम्यान लडाखमधील सीमेवर असणाऱ्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या युद्ध अभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दोन्ही देशांमधील संबंध आणखीन दृढ व्हावेत या हेतूने प्रत्येक देशातील दोन याप्रमाणे चार युद्धनौकांनी युद्ध सराव केल्याचे जपानच्या नौदलाने स्पष्ट केलं आहे. आम्ही या युद्ध सरावाचा उपयोग दोन्ही देशांमधील स्ट्रॅटर्जिक कम्युनिकेशनसाठी करत आहोत, असं नॅशनल मॅरेटाईम फाऊंडेशनचे डायरेक्टर जनरल व्हाइस अ‍ॅडमिरल प्रदीप चौहान यांनी दिली आहे. दोन्ही देशातील युद्ध नौका तेथे युद्धासाठी नाही तर सिग्नलिंगसंदर्भातील सरावासाठी होत्या, असंही चौहान यांनी स्पष्ट केलं.

भारताकडून आयएनएस राणा आणि आयएनएस कुशल या दोन युद्धनौका तर जपानकडून जेएस काशिमा आणि जेएस शिमायुकी या सरावामध्ये सहभागी झाल्या होत्या. मागील तीन वर्षांमध्ये भारत आणि जपानमधील हा १५ वा युद्ध सराव असल्याचे दिल्लीमधील जपानच्या राजदूतांनी स्पष्ट केलं आहे. या युद्धसरावामागे काहीही विशेष कारण नसल्याचे जपानी दुसातावासाचे प्रवक्ते तोशींहिंदे अॅण्डो यांनी म्हटलं आहे.
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
जपानचा भारताला कायमच पाठिंबा
डोकलाम संघर्षाच्या वेळी भारताला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये जपानचा समावेश होता. नवी दिल्ली आणि बिजिंगने लडाखमधील वाद हा द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दोन्ही देशांनी फेटाळला. तर जपानने २० भारतीय सैनिक शहीद झाल्यासंदर्भातील वृत्तावर दु:ख व्यक्त केलं होतं.