भारत-प्रशांत भागातील शांततेसाठी प्रयत्नशील

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

सिंगापूर - भारत-प्रशांत हा "नैसिर्गिक भाग' असून, या भागातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल धोरणात्मक भागीदारी करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूर दौऱ्यादरम्यान केले. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर हे दहा दक्षिण आशियाई देशांना भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्टीने जोडतात, असेही मोदींनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींनी शांग्रिला चर्चेदरम्यान भारताची भूमिका मांडली. "भारत-प्रशांत भागाकडे आम्ही केवळ धोरणात्मक दृष्टिकोनातून, अथवा वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने पाहत नाही. या भागातील शांतता, सुरक्षितता आणि मानवतावादी सहकार्यासाठी भारतीय नौदल प्रयत्न करत आहे. आमचे नौदल या भागात सदिच्छा मोहीम राबवित आहे. सिंगापूरबरोबर आम्ही गेली पंचवीस वर्षे अखंड नौदल सराव करत आहोत. तसेच आम्ही व्हिएतनाम, अमेरिका, जपान या देशांबरोबरही सराव करत आहोत,' असे मोदींनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत असून, त्या वेळपर्यंत नवा भारत निर्माण करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. 

Web Title: India, Indonesia for rules-based and peaceful Indo-Pacific region