'इज ऑफ डुइंग बिझनेस'मध्ये भारताची 23 गुणांची झेप

World Bank
World Bank

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या व्यवसायपूरक (इज ऑफ डुइंग बिझनेस) देशांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या वर्षी भारताने दमदार कामगिरी केली. 

दिवाळखोरीसंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी, कर सुसूत्रीकरण आणि इतर सुधारणांमुळे भारताने 23 गुणांची झेप घेत 77 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. गेल्या वर्षी या क्रमवारील भारत 100 व्या स्थानी होता. भारताची कामगिरी 10 पैकी सहा मानकांमध्ये सुधारल्याचे जागतिक बॅंकेच्या "इज ऑफ डुइंग बिझनेस 2019' या अहवालात म्हटले आहे. या मानकांमध्ये नवा उद्योग सुरू करणे, बांधकाम परवाने, वीजजोडणी, पतपुरवठा, करभरणा, सीमेपलीकडील व्यापार आणि दिवाळखोरीच्या प्रकरणांचा निपटारा आदींचा समावेश आहे. 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर "इज ऑफ डुइंग"मधील भारताची कामगिरी सरकारसाठी जमेची बाजू ठरणार आहे. केंद्रात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले, तेव्हा भारत "इज ऑफ डुइंग बिझनेस'मध्ये 142 व्या स्थानावर होता. "इज ऑफ डुइंग बिझनेस 2019'च्या यादीत 190 देशांमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानी असून, त्याखालोखाल सिंगापूर, डेन्मार्क आणि हॉंगकॉंग यांचा समावेश आहे. 

"इज ऑफ डुइंग बिझनेस'मध्ये पहिल्या 50 देशांत येण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मालमत्ता नोंदणी, कर, कंत्राट अंमलबजावणी आदी क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्यास भारताचे मानांकन आणखी वाढेल. 
- अरुण जेटली, अर्थमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com