India Covid-19 Case: 'होळी'वर कोरोनाचं गडद संकट; देशात 'इतक्या' रुग्णांची झाली नोंद!

covid
covidesakal

देशभरात ८ फेब्रुवारीला होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यापूर्वीच देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात तिप्पट रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशात 324 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 रूग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

शुक्रवारी रूग्णांचा आकडा 300 होता, तर आज 324 वर पोहोचला आहे. या नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर देशातील सक्रिय रूग्णांची संख्या 2 हजार 791 वर पोहोचली आहे.

covid
ShivSena: "निवडणूक आयोगाला 'तो' अधिकार नाही" संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या आकड्याने सरकार आणि जनतेची चिंता आणखी वाढवली आहे. यापूर्वीही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता. या वायरसमुळे मृतांची संख्या आता 5 लाख 30 हजार 775 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात २ आणि केरळमध्ये १ मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, (२०२० पासून) आतापर्यंत 4,46,87,820 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com