भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन पर्याय शोधतोय; अर्थमंत्र्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india looking for new options to import edible oil says nirmala sitharaman rak94

भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन पर्याय शोधतोय; अर्थमंत्र्यांची माहिती

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन पर्याय शोधत आहे. सीतारामन यांनी विदेश व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) एका कार्यक्रमात सांगितले की, रशिया-युक्रेन संघर्षामुळे भारताला खाद्यतेल आयात करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

त्यांनी सांगितले की, खाद्यतेलाच्या आयातीत अनेक अडचणी आहेत. आम्ही खाद्यतेल आयात करू शकत नाही. सूर्यफुलाचे तेल मिळत होते पण आता ते मिळत नाहीये. भारत युक्रेनमधून मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात करत असे, परंतु सध्याच्या परिस्थितीत ते करता येत नाही. सीतारामन म्हणाल्या की, अशा परिस्थितीत आम्ही इतर अनेक बाजारांमधून खाद्यतेल आयात करत आहोत आणि आम्ही काही नवीन बाजारपेठांचा देखील विचार करत आहोत.

यासोबतच त्यांनी देशांतर्गत व्यापाऱ्यांना या संधीचा फायदा घेऊन तेल निर्यातीच्या शक्यता पाहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की, उद्योजकांनी प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. केंद्र सरकार सदैव पाठिंबा देण्यास तयार आहे. सीतारामन यांनी भारतीय उद्योगांना ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी भागीदार शोधण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, या दोन देशांमध्ये उद्योगासाठी भागीदार शोधल्यास देशांतर्गत उद्योजकांना त्यांची व्याप्ती वाढवण्यास मदत होईल.

हेही वाचा: 'भाजपनं आधीच बाजी मारलेली आहे...'; चित्रा वाघ यांचं ट्विट

त्याच वेळी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि कॅनडासोबत मुक्त व्यापार करार (FTAs) या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अनुप्रिया पटेल यांनी परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपीय संघासोबत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्यासंबंधी वाटाघाटीची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: पुणे : वाहनतळापेक्षा रस्त्यावर द्यावे लागणार जादा शुल्क

हे करार या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले. भारताने गेल्या काही महिन्यांत संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ऑस्ट्रेलियासोबत FTA वर स्वाक्षरी केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये भारतीय उत्पादनांना सहज प्रवेश मिळणे अपेक्षित आहे. यावेळी पटेल म्हणाले की, देशाचा व्यवसाय सध्या ऐतिहासिक टप्प्यातून जात आहे. एकूण निर्यात 675 अब्ज डॉल होती, ज्यापैकी 419 अब्ज डॉलरची वस्तूंची निर्यात होती.

निर्यातीला देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसोबतच्या एफटीएमुळे निर्यातीशिवाय रोजगाराला चालना मिळेल.

हेही वाचा: ''संतांपुढे नतमस्तक झाले तर, त्यात.."; राज ठाकरेंना सावंतांचा टोला

Web Title: India Looking For New Options To Import Edible Oil Says Nirmala Sitharaman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top