महिलांसाठी भारत सर्वांत धोकादायक देश

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

भारत हा महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण या सर्व प्रकारात अग्रस्थानी आहे.

लंडन : भारत हा महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फांउडेशन या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे शोषण यामध्ये अग्रस्थानी आहे.

या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी युद्धग्रस्त सीरीया आणि अफगानिस्तानपेक्षाही असुरक्षित देश आहे. 550 विशेषज्ञांच्या टीमने हे सर्वेक्षण केलेले आहे. या यादीत अमेरिकाचाही समावेश करण्यात आला असून यामध्ये अमेरिकेचा तिसरा क्रमांक आहे. 

2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अफगानिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश सर्वांत असुरक्षित मानले गेले होते. परंतु, यावर्षी भारतातील महिलांचे वाढलेले प्रश्न पाहून यावेळी भारताला सर्वांत असुरक्षित देश असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. 

भारत मानव तस्करी करण्यात आणि महिलांना सेक्स व्यवसायासाठी परावृत्त करण्यात अव्वल आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या सर्वेच्या अहवालावर बोलण्यास नकार दिला आहे.

या अहवालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदी आपल्या घराच्या बागेतील योगा करतानाचे चित्रिकरण करण्यात व्यस्त आहेत. इथे देश महिला असुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल आहे, ही गोष्ट देशासाठी लाजिरवाणी आहे.
 

 

Web Title: India Most Dangerous Country For Women