
हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करेल अशा मिसाईलने वॉरिअर सज्ज असेल, हा मुख्य उद्देश वॉरिअरच्या निर्मितीमागे आहे.
नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून भारताने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि विमानांची आपल्या भात्यात भर घालत आहे. आता भारताने पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची निर्मिती सुरू केली आहे. बंगळूरमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या मेगा एअर शोमध्ये या सेमी-स्टेल्थ ड्रोनचं मॉडेल ठेवण्यात येणार आहे. 'वॉरिअर' असं या ड्रोनचं नाव असून हे स्वदेशी बनावटीचं ड्रोन ठरणार आहे. कॉम्बॅक्ट एअर टीमिंग सिस्टीम अर्थात CATS अंतर्गत हे ड्रोन विकसित करण्यात येत आहे. मानव आणि मानवरहित प्लॅटफॉर्मचं अजब मिश्रण असून शत्रूच्या हवाई सुरक्षेचं कवच सहज भेदू शकतं.
तेजस कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट या भारतीय बनावटीच्या फायटर विमानासह वॉरिअर ड्रोन हवेत झेप घेऊ शकेल, अशा पद्धतीनं त्याचं डिझाइन बनवण्यात येत आहे. जे युद्धावेळी तेजसचं रक्षण तर करेलच शिवाय शत्रूशी दोन हातही करेल. याचसाठी वॉरिअरची निर्मिती केली जात आहे. पुढील तीन ते पाच वर्षात वॉरिअरचा पहिला प्रोटोटाइप हवेत झेपावेल. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने यासाठी आर्थिक भार उचलला आहे. CATS उपक्रमांतर्गत देशात पुढील पिढीसाठी आवश्यक शस्त्रे आणि उपकरणे विकसित केली जात आहेत.
- वाहतूक शेतकऱ्यांनी नाही तर सरकारनेच बंद केलीय - राकेश टिकैत
या प्रोजेक्टमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका तेजस फायटर विमानासह अनेक वॉरिअर ड्रोन संचालित केले जाईल. प्रत्येक हवाई मोहिम यशस्वी होईल आणि पायलटच्या जीवाला धोका कमी होईल. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करेल अशा मिसाईलने वॉरिअर सज्ज असेल, हा मुख्य उद्देश वॉरिअरच्या निर्मितीमागे आहे.
- 'मां-बेटे झूठे हैं, चोर हैं'.. लाइव डिबेटमध्ये संबित पात्रा-गौरव वल्लभ भिडले
वॉरिअर पूर्णपणे स्टेल्थ विमान नाही. स्टेल्थ विमानांचं वैशिष्ट्य हे की ते रडारला त्याचा वेध घेता येत नाही. वॉरिअर हे सेमी स्टेल्थ प्रकारातील ड्रोन आहे. पण वॉरिअरचं वैशिष्ट्य म्हणजे ते लॉ ऑब्जर्वर प्लॅटफॉर्मवर तयार केलं जात आहे. त्यामुळे ते रडारवर सापडण्यास थोडं अवघड होणार आहे. युद्धात उपयोगी पडेल, असं ड्रोन विमान तयार करण्यासाठी एचएएल गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहे.
- CBSE - दहावी, बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर; करा डाउनलोड
द हंटर ड्रोन हादेखील या प्रक्रियेचा एक भाग आहे. २०० किलोमीटर भागातील लक्ष्याचा भेद करू शकतील, अशा हंटर क्रूज मिसाइलचा यात समावेश करण्यात येणार आहे. ऑर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगद्वारे अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी निशाणा साधू शकेल, अशा प्रकारचं स्वॉर्म ड्रोनही विकसित करण्यात येत आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)