पश्‍चिम बंगालमधून दोन कोटींचा अफू जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

सीमाशुल्क विभागाने सशस्त्र सेना दलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत पश्‍चिम बंगालमधील सिलिगुरी येथून साधारण दोन कोटी रुपयांचा अफू जप्त केला आहे.

सिलिगुरी : सीमाशुल्क विभागाने सशस्त्र सेना दलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत पश्‍चिम बंगालमधील सिलिगुरी येथून साधारण दोन कोटी रुपयांचा अफू जप्त केला आहे.

दोन गटांमध्ये मोठ्या रकमेच्या ड्रग्जची देवाण-घेवाण होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. "ड्रग्जच्या व्यवहारासाठी नेपाळमधून काही लोक मंगळावरी भारतामध्ये येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर आम्हाला पिशवी घेऊन एक माणूस संशयास्पद स्थितीत येताना दिसला. आम्ही त्याला अडविल्यानंतर तो पळून जाऊ लागला. पिशवी जड असल्याने त्याने ती तेथेच सोडून त्याने नजीकच्या एका घरात आश्रय घेतला. ती मध्यरात्रीच्या वेळ होती. तो नेमका कोणत्या घरात गेला माहिती नव्हते. कायदेशीररित्या मध्यरात्री घरांमध्ये जाऊन शोध घेणे चुकीचे असल्याने आम्ही त्याचा शोध घेतला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1.9 कोटी रुपये मूल्य असलेले 15 किलोचे अफू आम्ही जप्त केले आहे', अशी माहिती सशस्त्र सेना दलाच्या 41 बटालियनचे अधिकारी राजीव राणा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Web Title: india news afu seized two crore Opium police action nepal news marathi news

टॅग्स