लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

लग्नानंतर सासरी नेण्यापूर्वीच नववधूच्या कुटुंबियांकडे फ्रीज आणि सोन्याच्या साखळीची मागणी करणाऱ्या वराला आज (मंगळवार) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरिया (छत्तीसगढ) : लग्नानंतर सासरी नेण्यापूर्वीच नवविवाहित वधूच्या कुटुंबियांकडे फ्रीज आणि सोन्याच्या साखळीची मागणी करणाऱ्या वराला आज (मंगळवार) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्तीसगढमधील कोरिया गावात हा धक्कादायक प्रकार घडला. लग्न पार पडल्यानंतर वराने वधूच्या कुटुंबियांना फ्रीज आणि सोन्याच्या साखळीची मागणी केली. ही मागणी फेटाळल्याने वराने कुटुंबियांशी गैरवर्तन केले. दरम्यान उपस्थित नातेवाईक आणि पाहुण्यांनी वराचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर आपल्या मागण्यांवर अडून बसला. शेवटी मागणी पूर्ण न झाल्याने वराने नववधूला सासरी नेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या वधूने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी हुंड्याच्या प्रकरण नोंदवून घेतले असून विविध कलमांतर्गत वराला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी आनंद सोनी यांनी दिली. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: india news Chhattisgarh news dowry marriage groom bride

टॅग्स