गुजरातमधील दप्तरांवर अखिलेश यांचे छायाचित्र

पीटीआय
मंगळवार, 13 जून 2017

अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील प्राथमिक शाळांत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र असलेल्या दप्तरांचे वाटप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अहमदाबाद - भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील प्राथमिक शाळांत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र असलेल्या दप्तरांचे वाटप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने अखिलेश यादव व त्यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाला धूळ चारली होती; मात्र हेच अखिलेश यादव सध्या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या सुमारे 12 हजार दप्तरांवर झळकत आहेत. यामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला असून, या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी दिली.
राज्य सरकारच्या "शाळा प्रवेशोत्सव' या उपक्रमाअंतर्गत छोटा उदयपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना या दप्तरांचे वाटप करण्यात आले असून, त्यावर गुजरात सरकारच्या स्टिकरसह अखिलेश यादव यांचे एक हसतमुख छायाचित्रही आहे. हा प्रकार वसेडी गावातील शिक्षकांच्या निदर्शनास आला.

शिक्षणाबद्दलचे गांभीर्य कळाले....
समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असताना ही दप्तरे तयार करण्यात आली होती. आता ती रिसायकल करून गुजरात सरकारच्या विद्यार्थ्यांना वितरित करत आहे. शिक्षक उपलब्ध करून देण्याऐवजी दप्तरांचे वाटप करून शोबाजी करणाऱ्या गुजरात सरकारला शिक्षणाचे किती गांभीर्य आहे, हे यावरून स्पष्ट होते, असा टोला गुजरात काँग्रेसचे
प्रवक्ते मनीष जोशी यांनी लगावला.

Web Title: india news gujrat akhilesh yadav gujrat school