दलित व्यक्तीशी विवाह केल्याने गर्भवती महिलेला जिवंत जाळले

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

विजापूर (कर्नाटक) : दलित व्यक्तीशी विवाह केल्यामुळे एका गर्भवती महिलेला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विजापूर (कर्नाटक) : दलित व्यक्तीशी विवाह केल्यामुळे एका गर्भवती महिलेला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील गुंडनकाला एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातील सायाबन्ना शरणाप्पा कोन्नूर (वय 24) या दलित तरुणाशी गावातील बानू बेगम (वय 21) या मुस्लिम तरुणीचे प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाला दोन्ही कुटुंबियांचा विरोध होता. सायबन्नाविरुद्ध मुलीच्या कुटुंबियांनी तक्रारही केली होती. मात्र कुटुंबियांचा विरोध पत्करून दोघांनी गोव्यात पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर बानू बेगम गर्भवती दोन्ही कुटुंबे आपल्याला स्वीकारतील या आशेवर 3 जून रोजी दोघेही गावात परतले. मात्र दोन्ही कुटुंबियांची मानसिकता बदललेली नव्हती. मुलीच्या कुटुंबियांनी दोघांनाही जबर मारहाण केली. दरम्यान सायाबन्ना पळून जाण्यात यशस्वी झाला. तर बानू बेगमला तिच्या कुटुंबियांनी जिवंत जाळले. या प्रकरणी पोलिसांनी बानूची आई, बहिण आणि दीराला ताब्यात घेतले आहे.

Web Title: india news national news marathi news maharashtra news crime