भारत कमकुवत राष्ट्र नाही - निर्मल सिंग

यूएनआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

जम्मू - भारत हे कमकुवत राष्ट्र नसल्याचे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. पाकिस्तानने जर शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबविले नाही, तर पाक स्वतःच्याच हाताने स्वतःचा सर्वनाश ओढवून घेईल, असा इशारा जम्मू-काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी पाकिस्तानला आज दिला.

भारत हे कमकुवत राष्ट्र नाही, हे पाकिस्तानने मान्य करावे, असे सिंग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पाकिस्तानने सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि सर्वसामान्यांना लक्ष्य करणे थांबविले नाही तर पाकिस्तान स्वतःच्या हाताने स्वतःचा सर्वनाश ओढवून घेईल. लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षा दले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून पाकचा डाव उधळून लावत आहेत, असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवू, असे स्पष्ट करीत ते म्हणाले, की पाकिस्तान व्हिएन्ना कराराचा भंग केला असून, जगाने त्यांची निंदा केली आहे. पाकिस्तान हे स्वतःच बलुचिस्तान, गिलगिट व बाल्टीस्तान येथील नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवीत आहे. मात्र त्यांना येणाऱ्या दिवसांत त्याची किमत मोजावी लागेल. दहशतवाद आणि मैत्री एकत्र चालणार नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, याची त्यांनी या वेळी आठवण करून दिली.

Web Title: India is not a weak nation