व्यापारयुद्धात भारताला संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी दिल्ली - चीनने अमेरिकेतून आयात ३३४ वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे, तर अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर आयात शुल्क लावले आहे. जगातील या  सर्वांत मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये सध्या सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होणार असून  कापूस, मका आणि तेलबिया पेंड निर्यातीला संधी आहे, असे व्यापरतज्ज्ञांनी सांगितले.

व्यापारयुद्धाचा फायदा भारतालाच असून कापूस, मका आणि तेलबिया पेंड उत्पादकांना आशियायी देशांतील बाजार उपलब्ध होऊ शकतो. ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाच्या किमती स्पर्धात्मक राहिल्यास भारतीय मालाला या बाजारात पाऊल टाकता येणार आहे. सोयाबीन पेंड- मोहरी पेंड या तेलबिया पेंड, कापूस आणि मका निर्यातदारांना संधी आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

चीनने अमेरिकेतून देशात आयात होणाऱ्या १२८ वस्तूंवर आधीच आयात शुल्क लावले होते, त्यामुळे अमेरिकेच्या या वस्तूंच्या निर्यातीवर परिणाम झाला. परिणामी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी मंगळवारी चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर २५ टक्के अायात शुल्क लावले. याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी चीन सरकारनेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या आणखी १०६ वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावले. 

कापूस निर्यातवाढीला संधी  
यंदा चीनमध्ये कापूस लागवडीचे नियोजन चुकल्याने कापसाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. देशातील गरज भागविण्यासाठी चीनने कापूस आयातीसाठी दारे उघडी केली. चीनमध्ये होणाऱ्या कापूस निर्यातीमध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनने आता अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावर २५ टक्के शुल्क लावले आहे.  भारतातून आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, त्यामुळे भारताला चीनमध्ये कापूस निर्यात वाढविण्यास संधी आहे, असे व्यापारी व निर्यातदारांनी सांगितले. 

चीनने भारतीय कापसावर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावलेले नाही. तसेच भारतीय कापूस अमेरिकेच्या कापसापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे भारताला चांगली संधी आहे. 
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ

Web Title: India offers opportunities in trade warfare