भारत-पाकिस्तान करणार एकत्र लष्करी सराव 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : वर्षानुवर्षे एकमेकांवर बंदूक ताणून असलेले भारताचे आणि पाकिस्तानचे सैनिक येत्या काही दिवसांत एकत्र लष्करी सराव करणार आहेत. 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'तर्फे रशियामध्ये बहुदेशीय लष्करांचा दहशतवादविरोधी सराव आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानचे लष्कर प्रथमच एकत्र सराव करणार आहे. 

'शांतता मोहीम 2018' या मोहिमेंतर्गत चीन, रशियासह 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'मध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांचे लष्कर सहभागी झाले आहे. रशियातील चेबर्कुल येथे हा सराव कालपासून (शुक्रवार) सुरू झाला आहे. यात रशियाचे 1700, चीनचे 700, भारताचे 200, पाकिस्तानचे 110 सैनिक सहभागी झाले आहेत. हा सहा दिवसांचा सराव 29 ऑगस्टपर्यंत असेल. दहशतवादाविरोधाच्या लढ्यातील आधुनिक तंत्र आणि इतर क्‍लुप्त्या शिकण्याची संधी या सरावातून मिळणार आहे. 

'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'ची मूळ कल्पना चीनची होती. 2001 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेत चीनसह कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.

Web Title: India, Pakistan armies march together as SCO anti-terror drill begins in Russia