महाराष्ट्रात २४ तासात आठ हजार पार; तर देशात सापडले तब्बल एवढे रुग्ण

वृत्तसंस्था
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून सगळीकडेच चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण सापडले आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून सगळीकडेच चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण सापडले आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत असून ही चिंतेची बाब आहे. काल एका दिवसात राज्यात तब्बल २२३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृत्यूंचा आकडा १० हजार ११६ झाला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात एकूण २८ हजार सहाशे ३७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, ५५१ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. पाच लाख ३४ हजरा ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर दोन लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
---------------
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा
---------------
काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 
---------------
दरम्यान, मागील आठ दिवसांपासून देशात प्रत्येक तासांला एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आठ दिवसांत देशात दोन लाख नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India reports 28,637 new cases, 551 deaths in the last 24 hours