'सेल्फी'च्या नादात मरणाला निमंत्रण...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

सर्व वयोगटांत "सेल्फी'चा नाद वाढत चालला असून, त्यात स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष होत आहे. रेल्वे डब्यावर चढून "सेल्फी' काढण्याच्या नादात उच्च दाबाच्या विजेच्या तारेचा झटका बसून ओडिशात अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला नुकताच जीव गमवावा लागला; पण कोणी धडा घेत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते...

देशनिहाय "सेल्फी'चे बळी

 • भारत - 76
 • पाकिस्तान - 9
 • अमेरिका - 8
 • रशिया - 6
 • फिलिपिन्स - 4
 • चीन - 4
 • स्पेन - 3
 • इंडोनेशिया - 2
 • पोर्तुगाल - 2
 • पेरू - 2
 • तुर्कस्तान - 2
 • अन्य - 9

 सामूहिक "सेल्फी' घेताना झालेले मृत्यू ः 24
- मार्च 2014 ते सप्टेंबर 2016 या काळातील जगातील एकूण मृत्यू ः 127
- 68% बळींचे वय 24 वर्षांच्या आतील
- 75.5% पुरुषांचा मृतांत समावेश

"सेल्फी' घेतानाचे भारतातील सर्वाधिक मृत्यू ः 7
- नागपूरजवळच्या मंगरूर तलावात मार्च 2015 मध्ये "सेल्फी'च्या नादात बोट उलटून सात मृत्युमुखी
- जून 2016 ः कानपूरजवळ गंगेत "सेल्फी' काढताना सात जणांचा बुडून मृत्यू

मृत्यूची मुख्य कारणे
- उंचावरून कोसळणे
- बुडणे
- रेल्वेची धडक बसणे

2015मध्ये "गुगल फोटोज'वर 24 अब्ज "सेल्फी' अपलोड झाल्या होत्या.

Web Title: India reports maximum selfie deaths